उत्तरेश्वर देवस्थानाला केमच्या कन्येकडून एक लाख रुपयांची देणगी

केम (संजय जाधव) : केम (ता.करमाळा) येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर देवस्थान अन्नछत्रास कै.दत्तात्रय भागवत पोतदार यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कन्या प्रतिभा मोहन दिक्षीत यांच्याकडून अन्नछत्रास कायम स्वरूपी ठेव म्हणून ५१ हजार व मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ५१ हजार रुपये अशा देणगीचा चेक मंदिर कमीटीकडे सोपविण्यात आला.

आज सोमवारचे अन्नदातै सुरेश भोसले यांच्या कार्यक्रमात प्रतिभा दिक्षीत व त्यांचे पती मोहन दिक्षीत यांचा श्री उत्तरेश्वर देवस्थानची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी चेअरमन दादासाहेब गोडसे, सचिव मनोज सोलापूरे, सदस्य विजय तळेकर, अरुण वासकर माजी सरपंच आकाश भोसले,पत्रकार संजय जाधव पोस्टमन प्रशांत वेदपाठक, पुजारी समाधान गुरव उपस्थित होते यांचे केम व परिसरातून कौतूक केले जात आहे.
आपले आई वडील हयात नसताना देखील केमच्या कन्या प्रतिभा दीक्षित यांनी माहेरच्या गावाशी नाते जोडून ठेवलेले आहे इतर मुलींनी त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे.
● मनोज सोलापूरे, केम




