भालचंद्र गाडे यांचे ‘बौध्दाचार्य’ च्या परीक्षेत यश

करमाळा (दि.७) : दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा यांच्यावतीने ऑक्टोबर २०२४ मध्ये बौध्दाचार्यांच्या परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामधे केम (ता.करमाळा) येथील रहिवासी असलेले भालचंद्र महादेव गाडे हे या परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

भालचंद्र गाडे हे धम्म कार्यात तसेच विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असतात. बौध्दाचार्याची परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल भारतीय बौध्द महासभा शाखा करमाळा यांच्या वतीने व परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.


