शासनाने पत्रकारांना कुटूंबाच्या कल्याणासाठी आत्मनिर्भर योजना राबवाव्यात – जेष्ठ पत्रकार डॉ.ॲड.बाबूराव हिरडे

करमाळा (दि.८): पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, समाजाचे अविरत सेवा करणारा प्रमुख घटक आहे. कुटुंबाच्या कल्याणासाठी आत्मनिर्भर योजना राबवून पत्रकारांना न्याय देण्याचे काम करावे असे मत ज्येष्ठ पत्रकार ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष डॉ.ॲड.बाबुराव हिरडे यांनी व्यक्त केले.

6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त करमाळा तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार भारतीय जनता पार्टी करमाळा तालुका यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.ॲड.बाबुराव हिरडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार, भाजप जिल्हा चिटणीस श्याम सिंधी,भाजप प्रज्ञा सेलचे जिल्हाध्यक्ष पत्रकार सुहास घोलप, , भाजपाचे जेष्ठ नेते संजय अण्णा घोरपडे, बाळासाहेब कुंभार किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर, भाजप शहराध्यक्ष जितेश कटारीया, पत्रकार विशाल घोलप उपस्थित होते.

पुढे बोलताना ॲड.हिरडे म्हणाले कि, डिजिटल पत्रकारितेचे युग असले तरी वाढत्या स्पर्धेमुळे खुश मिस्करी करणाऱ्यांची संख्या वाढल्याने पत्रकारांना समाजाला न्याय देताना तारेवरची कसरत करत आर्थिक ताण सहन करून पत्रकारिता करावी लागत आहे. दैनिकाकडूनही जाहिरातींचा कोटा पूर्ण करण्यासाठी दबाव वाढत आहे. पोर्टल यूट्यूब सोशल मीडियामुळे जाहिरातीवरही मर्यादा आली आहे. त्यामुळे पत्रकार यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून पत्रकारांना कुठल्याही प्रकारची अनुदान सवलती मिळत नाही. शासनाने सर्व घटकांना न्याय दिला आहे परंतु समाजासाठी अविरत झटणारा पत्रकारांना मात्र अद्यापही सोयी सवलती पासून वंचित ठेवणे ठेवले आहे. पत्रकार कल्याणकारी महामंडळाची घोषणा झाली असली तरी आर्थिक तरतूद होणे गरजेचे आहे. पत्रकारांना त्यांच्या कुटुंबासाठी मोफत वैद्यकीय विमा कुटुंब कल्याण योजना राबवणे ही खरी काळाची गरज आहे.

आजच्या वास्तवादी जगामध्ये खऱ्या अर्थाने निस्वार्थ भावनेने काम करणारा पत्रकार हाच एकमेव घटक समाजामध्ये असल्यामुळे लोकशाही जिवंत आहे. पत्रकारितेची परंपरा जपण्यासाठी पत्रकारांना खऱ्या अर्थाने आपण न्याय देण्यासाठी काम करावे. करमाळा तालुक्याच्या विकासासाठी आपण करत असलेल्या कार्याला नक्कीच आम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून पाठबळ देऊन आपली कामे जनतेसमोर मांडून तुमच्या कामाचा नक्कीच सन्मान करणार असल्याचे ज्येष्ठ पत्रकार ॲड. हिरडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमामध्ये पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे,नासीर कबीर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार, ज्येष्ठ नेते संजय आण्णा घोरपडे, सुहास घोलप , नरेंद्रसिंह ठाकुर पत्रकार विशाल घोलप ,आशपाक सय्यद, अशोक नरसाळे, जयंत दळवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात प्रकार दिनानिमित्त महेश चिवटे, ॲड बाबुराव हिरडे, नासिर कबीर, अशोक नरसाळे,आशपाक सय्यद,दिनेश मडके ,सुहास घोलप, शितल कुमार मोटे,नरेंद्रसिंह ठाकुर, राजेश गायकवाड सर , विशाल घोलप, अशोक मुरूमकर, प्रफ्फुल दामोदरे, शंभूराजे फरतडे,हर्षवर्धन गाडे, राहुल रामदासी, सुनील भोसले, सिद्धार्थ वाघमारे, तुषार जाधव ,सूर्यकांत होनप, राजु सय्यद, प्रशांत भोसले, दस्तगीर मुजावर, नागेश चेंडगे,यांचा पत्रकार दिनानिमित्त भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार जिल्हा सरचिटणीस श्याम सिंधी, विनोद महानवर भाजप जिल्हा किसान मोर्चा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर, ज्येष्ठ नेते संजय अण्णा घोरपडे, सोशल मीडिया प्रमुख नितीन कांबळे,शहराध्यक्ष जितेश कटारीया, माजी शहराध्यक्ष आदेश कांबळे,शहर उपाध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या हस्ते डायरी पेन शाल गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्रसिंह ठाकुर सूत्रसंचालन विनोद महानवर यांनी केले तर आभार संजय घोरपडे यांनी मानले.
