जिजाऊ जन्मोत्सवासाठी करमाळा तालुक्यातील कार्यकर्ते सिंदखेडराजाला रवाना

करमाळा(दि.११) : उद्या १२ जानेवारी रोजी असणाऱ्या राजमाता जिजाऊ जन्मोत्सवासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे करमाळा तालुक्यातील कार्यकर्ते रवाना झाले आहेत.
सिंदखेडराजा येथे मराठा सेवा संघाद्वारे जिजाऊ सृष्टी मात्तृतिर्थ सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा येथे दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी ४२७ वा भव्य आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले आहे. दिनांक ११ जानेवारी संध्याकाळी ५-०० वाजता जिजाऊ जन्मस्थळ राजवाड्यावर दीपोत्सव ५-३० वाजता मशाल यात्रा राजवाडा ते जिजाऊ सृष्टी ८-३० वाजता जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र तर्फे महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक १२ जानेवारी सकाळी ६-०० वाजता महापूजा ( राजे लखुजीराव जाधव यांचा वाडा) सकाळी ७-०० वाजता भव्य पालखी सह वारकरी दिंडी राजवाडा ते जिजाऊ सृष्टी, सकाळी ९-०० वाजता शिवधर्म ध्वजारोहण, सकाळी ९-००ते १.३० शाहिरांचे पोवाडे , नवोदित वक्ते, सांस्कृतिक कार्यक्रम, विशेष सत्कार,प्रकाशन सोहळा, सिंदखेडराजा येथे भव्य स्वरूपात साजरी होत आहे. तसेच देश विदेशातून व परराज्यातून जिजाऊ भक्त सर्व जाती-धर्मातील लोक उपस्थित असतात. व माता भगिनीची उपस्थिती लक्षणीय असते. तसेच या ठिकाणी विचारांच्या पुस्तकाचे हजारो स्टॉल लागलेले असतात. कोट्यावधी पुस्तके विकली जातात. व कृषी उद्योगापासून विविध प्रकारचे या ठिकाणी मोठ मोठे स्टॉल लागलेले असतात.
सिंदखेडराजा येथे होणाऱ्या या सोहळ्याचे करमाळा तालुक्यातून सचिन काळे (तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ) सुहास पोळ (तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड), बाळासाहेब झोळ अतुल निर्मळ प्रफुल्ल कुमार गोडसे गणेश कुकडे संदीप रोडगे राज झिंजाडे भीमराव लोंढे पिंटू जाधव हेमंत शिंदे धन्यकुमार गारुडी निलेश पाटील पांडुरंग घाडगे योगेश मोहिते सौरभ कर्चे आजिनाथ माने अजित उपाध्ये बाळासाहेब तोरडमल आदी जण रवाना झाले आहेत.




