उजनी जलपर्यटन संदर्भातील कामास गती- आमदार अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

करमाळा(दि.११) : उजनी जलपर्यटन आराखड्यासंदर्भात भीमानगर (ता. माढा) येथील शासकीय विश्रामगृहात करमाळा व माढाचे आमदार, जलसंपदा विभागाचे अधिकारी व नागरिक यांच्या उपस्थितीत दि.७ ला बैठक पार पडली. उजनी धरण येथे भव्य जल पर्यटन केंद्र विकसित व्हावे अशी भूमिका आमदार नारायण पाटील व आमदार अभिजीत पाटील यांनी यावेळी मांडली.
उजनी जलाशयात स्पीड बोट हाऊस बोट रेस्टॉरंट कृषी पर्यटन पर्यटकांसाठी राहण्याची व्यवस्था आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी जलसंपदा अधिकाऱ्यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून प्रस्तावित प्रकल्प दाखविला उजनी धरण परिसरात जल पर्यटनासंदर्भात कामास गती मिळाली असून विविध निविदास ही प्रसिद्ध झाल्या आहेत बैठकीदरम्यान आमदार अभिजीत पाटील व आमदार नारायण पाटील यांनी विविध सोयी सुविधांबद्दल अधिकाऱ्यांची व नागरिकांची मते जाणून घेतली.
उजनी धरणा वरती जलपर्यटन, धार्मिक, निसर्ग, कृषी, विनयार्ड, विकास एकात्मिक पर्यटन आदी 282.75 कोटीच्या विकास आराखड्यास शासनाने मान्यता दिली असून सदर प्रस्तावित कामे तीन टप्प्यांमध्ये म्हणजे 31 मार्च 2027 पर्यंत करण्याचे शासनाचे धोरण असल्याचे शासन निर्णयाचे परिपत्रकात म्हटले आहे.
यावेळी दोन्ही तालुक्याच्या आमदारांसह, जलसंपदा विभागाचे अधिकारी अभियंता श्री. खांडेकर उजनी धरण मुख्य कार्यकारी अभियंता रा.पो.मोरे उपविभागीय अधिकारी श्री खडतरे आदीजन उपस्थित होते




