उंदरगावात ग्रामस्वच्छता सप्ताहाचे सह विविध विषयांवर व्याख्यानमाला आयोजित
करमाळा(दि.१७): उंदरगाव येथे शनिवार दि १८ ते २४ जानेवारी या कालावधीत ग्रामस्वच्छता सप्ताहाचे आयोजन केले असून यामध्ये विविध क्षेत्रातील अधिकारी व प्रबोधनकार,यांची सप्ताहामध्ये मांदियाळी असणार आहे.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथील विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय् सेवा योजना यांच्या माध्यमातून “युवकांचा ध्यास-ग्राम व्शहर विकास” हे ब्रीद वाक्य घेऊन उंदरगाव (ता करमाळा) येथे गावातील स्वच्छ्ता,शोषखड्डे, करण्याचा उपक्रम हाती घेतला असून ग्रामपंचायतने ग्रामस्वच्छता मोहिमेची जोरदार तयारी केली आहे. या सप्ताह मध्ये खालील कार्यक्रम होणार आहेत
- या सप्ताहमध्ये कृषि विषयक,ग्रामविकास,अंधश्रद्धा, ग्रामीण लोककला भारुड या प्रबोधनात्मक कार्यक्रमांची मेजवाणी मिळणार
- महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असणार आहे.
- गावातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भूमिपुत्रांचा सन्मान सोहळा होणार आहे.
- डॉ कोमल शिर्के व टीम आरोग्य तपासणी करणार आहेत,
- तर डॉ मनिष यादव व टीम पशुधन लसिकरण करणार आहेत.
- स्मार्ट व्हिलेज संकल्पनेवर प्रा डॉ सुधीर इंगळे यांचं व्याख्यान
- “डोळे असून आंधळे कसे” या विषयावर श्री दत्तात्रय येडवे व श्री संजय बिदरकर यांचे व्याख्यान होणार
- केळी पिकावर श्री विनोद देशमुख यांचे व्याख्यान
- ग्रामीण विकासात युवकांचे योगदान या विषयावर डॉ सतीश देसाई
- मी गाडगे महाराज बोलतोय या विषयावर समाजसुधारक श्री फूलचंद नागटिळक यांचे व्याख्यान होणार आहे.
या सप्ताहसाठी उपप्राचार्य डॉ अनिल साळुंखे संभाजी किर्दाक रा से यो चे जिल्हा समन्वयक प्रा लक्ष्मणराव राख प्रा आर जी श्रीरामे प्रा एस एम् पाटील, प्रा.सुजाता भोरे प्रा एम् बी धिंदळे प्रा गजेंद्र रोकडे ग्रामसेवक यशवंत कुदळे सरपंच युवराज मगर उपसरपंच शिवाजी कोकरे व ग्रामपंचायत कर्मचारी सागर कुंभार हे परिश्रम घेत आहेत.
सात दिवसाच्या कालावधी मध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या राहण्याची व जेवणाची उत्तम सोय ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार असून ग्रामस्वच्छ्ता कामासाठी गावातील युवक वर्ग महिला व नागरिकही सहभागी होणार आहेत.