विहाळ येथील डॉ. सुरवसे यांच्या पुस्तकांचे श्रीलंका व पॅलेस्टाईनच्या तज्ज्ञांच्या हस्ते प्रकाशन
करमाळा(दि.२३) : विहाळ गावचे सुपुत्र व सध्या वरवंड (पुणे) येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. राजेश सुरवसे यांनी लिहिलेल्या भूगोल विषयाच्या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा श्रीलंका व पॅलेस्टाईन येथील विदेशी तज्ज्ञांच्या हस्ते करण्यात आला. हा प्रकाशन सोहळा सोमवार दिनांक 20 जानेवारी रोजी संपन्न झाला.
सुरवसे हे वरवंड ग्राम शिक्षण संस्थेच्या एकनाथ सिताराम दिवेकर महाविद्यालयाच्या भूगोल विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
सदर पुस्तक प्रकाशन सोहळ्यास कोलंबो, श्रीलंका येथील केलानिया युनिव्हर्सिटी चे सोशल सायन्स विषयाचे डीन व भूगोल विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. अमरसिंघे सर, पॅलेस्टाईन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॉ. मुंथर सर व सॅलीसबरी युनिव्हर्सिटी (USA) व स्टॅन्डफोर्ट युनिव्हर्सिटी चे एमिनेटेड प्रोफेसर डॉ. प्रवीण सप्तर्षी सर, माळशिरस महाविद्यालयातील भूगोलतज्ञ डॉ. संतोष माने, खेड येथील डॉ. सुनील पाचरणे, वरवंड ग्राम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय संजयअण्णा दिवेकर संस्थेचे विश्वस्त अंकुशभाऊ दिवेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल शितोळे, उपप्राचार्य डॉ. शरद गाडेकर, भूगोल विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय दुर्गाडे, महाविद्यालयातील सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. सुरवसे यांची आत्तापर्यंत सहा पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यांच्या नावावर 51 भारतीय पेटंट, पाच ब्रिटनचे पेटंट व तीन कॅनडाचे पेटंट प्रकाशित झालेले आहेत.
यावेळी कोलंबो येथील केलानिया युनिव्हर्सिटी चे डीन प्रोफेसर डॉ.अमरसिंघे सर यांनी डॉ. सुरवसे यांना अभ्यास दौऱ्याकरिता श्रीलंका येथे आमंत्रित केले आहे.
डॉ. सुरवसे यांच्या यशाबद्दल विदेशी पाहुण्यांनी, तसेच संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य सर्व सहकारी यांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले.