शिवकीर्ती स्कुल मध्ये बाल आनंदी बाजार उत्साहात संपन्न
केम(संजय जाधव): केम येथील शिवकीर्ती इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गुरुवारी २३ जानेवारीला बाल आनंदी बाजार व हळदी कुंकू समारंभ मोठया उत्साहात साजरा करण्यात आला
शिवकीर्ती या शाळेमध्ये शालेय अभ्यासक्रमाबरोबरच इतर सहशालेय उपक्रमांचे आयोजन केले जाते. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील बाल आनंदी बाजार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी इयत्ता नर्सरी ते इयत्ता पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे, खाऊ व शालेय साहित्य अशाप्रकारची एकूण 70 स्टॉल शाळेच्या आवारात लावली होती. त्यामधून विद्यार्थ्यांना साधारणपणे एकूण 17540 रुपयांची उलाढाल झाली तसेच भारतीय संस्कृतीमध्ये सौभाग्याचे प्रतीक मानला जाणारा हळदी कुंकू हा कार्यक्रम सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील शाळेत आयोजित केला होता.
यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या हळदीकुंकू कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्व पालक मंडळींनी बाजारामध्ये खरेदी केली . हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व पालकांचे सहकार्य लाभले.