करमाळा येथे श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा २७ जानेवारी ला भव्य पादुका दर्शन सोहळयाचे आयोजन.. - Saptahik Sandesh

करमाळा येथे श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा २७ जानेवारी ला भव्य पादुका दर्शन सोहळयाचे आयोजन..

करमाळा(दि.२६) : अनंत श्री विभूषित जगद्‌गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज (नाणीजधाम)यांचा पादुका दर्शन सोहळा सोलापूर जिल्हा सेवा समिती अंतर्गत करमाळा तालुका यांच्यावतीने सोमवार दि. २७ जानेवारी २०२५ सकाळी ९ वा.यशवंतराव चव्हाण महाविद्यालय प्रांगण, (वाय सी एम कॉलेज) करमाळा जि.सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.


त्यापूर्वी अनंत श्री विभूषित जगद्‌गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज (नाणीजधाम) यांच्या पादुकांची सकाळी ९ वाजता शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर पादुकांचे संतपीठावर आगमन होणार आहे. या निमित्ताने निराधार व गरीब २७ महिलांना शिलाई मशिन वाटप करण्यात येणार आहे. गुरुपूजन, आरतीपूजन, प्रवचन, उपासक दिक्षा, दर्शन, पुष्पवृष्टी असे कार्यक्रम दिवसभर होणार आहेत. यानिमित्ताने भाविकांना महाप्रसाद वाटप केला जाणार आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्व-स्वरुप संप्रदाय सोलापूर जिल्हा सेवा समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

जगद्‌गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. गरजू सुशिक्षित बेरोजगार युवकांना वाहन प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्याचे काम केले जात आहे . जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या वतीने राज्यातील विविध महामार्गावर ५३ रुग्णवाहिका महाराष्ट्रभर 24 तास मोफत सेवा देत आहेत. त्याचा गोरगरिब रुग्णांना फायदा होत आहे. संस्थानच्या वतीने ४ जानेवारी ते १९ जानेवारी पर्यंत एक लाख रक्तदानाचा संकल्प होता विक्रमी १ लाख ३६ हजार २७० बाटल्या रक्त संकलित करुन ते गोरगरिब रुग्णांना देण्यात आले.

असे विविध उपक्रम संस्थानच्या वतीने राबविले जात असल्याचे जिल्हा स्व-स्वरुप संप्रदायाच्या वतीने सांगण्यात आले आहे तरी करमाळा तालुक्यासह जिल्ह्यातील ‌ भाविक भक्त शिष्य साधक बंधू भगिनींनी या बहुसंख्येने उपस्थित राहुन या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सोलापूर जिल्हा अध्यक्ष आबासाहेब शिंदे जिल्हा सचिव मारुती भोसले, जिल्हा निरीक्षक सचिन काकडे, सोलापूर महिला अध्यक्ष सौ सविताताई परांडे सोलापूर जिल्हा युवा अध्यक्ष देविदास ननवरे सोलापूर जिल्हा कर्नल अशोक केळकर करमाळा तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण चोरमले, माजी तालुकाध्यक्ष दिनेश मडके, महिला तालुकाध्यक्ष सौ रोहिणी सरडे, विशेष कार्यवाहक संतोष हंडाळ व स्व स्वरूप सांप्रदाय सोलापूर जिल्हा सेवा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!