येत्या रविवारी केम येथे ‘सोलापूर उद्योग रत्न पुरस्कार’ सोहळा – अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची असणार उपस्थिती
केम (संजय जाधव): येथील युगंधर ग्रामीण सेवाभावी संस्थेच्या वतीने ‘सोलापूर उद्योग रत्न २०२४-२५’ या पुरस्काराचे वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, तरी या कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयसिंह ओहोळ यांनी केले आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा केम (ता.करमाळा) येथे २ फेब्रुवारी रोजी इंद्रायणी लॉन्सवर सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यामध्ये करमाळा तालुक्यातील व्यवसाय क्षेत्रातील उत्तुंग यश मिळविणाऱ्या उद्योजकांचा यावेळी सन्मान होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी या उपस्थित राहणार आहेत तरी करमाळा तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयसिंह ओहोळ यांनी केले आहे.