करमाळा येथील छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या सामाजिक कार्याबद्दल करमाळा पोलिसांकडून सन्मान

करमाळा(दि.३०): करमाळा पोलीस स्टेशन कडून गणेश उत्सव काळात उत्कृष्ट देखावा व शांततेत श्री गणेश मिरवणूक काढल्या बद्दल सावंत गल्ली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळास करमाळा पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या शुभहस्ते प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र मंडळाचे अध्यक्ष संदीप दुधाळ यांना देण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे, नायब तहसीलदार लोकरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गजानन गुंजकर, करमाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे, सहकारी संस्थेचे उमेश बेंडारी गटविकास अधिकारी अमित कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अभिषेक पवार, भुमी अभिलेख उप अधीक्षक प्रिया पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी मंडळाचे आधारस्तंभ सुनील बापू सावंत, मार्तंड सुरवसे पांडुरंग सावंत बापू उबाळे, गणेश सावंत,पियुष सावंत, शुभम चाॅंदगुडे, जय बिडकर ,शुभम कोंगे, गणेश किरवे, युवराज शिंदे,यश महाडिक, आझाद शेख,जमीर सय्यद आदी जण उपस्थित होते.
चालू वर्षी श्री गणेश उत्सव काळात सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने आदर्श गणेश उत्सव संकल्पना, समाजामध्ये अभिमानास्पद काम, उत्कृष्ट देखावा, शांततेत मिरवणूक, तसेच सदर मंडळाचे सामाजिक कार्य , सार्वजनिक उपक्रम तसेच समाजामध्ये हिंदू मुस्लिम एकोपा जपणे या साठी बक्षीस ठेवण्यात आले होते यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाने सोलापूर जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविला असून करमाळा तालुक्यातुन प्रथम क्रमांक मिळाला असून याबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे करमाळा शहरातील महिला व नागरिकांनी अभिनंदन केले व कौतुकही केले आहे






