प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ७ फेब्रुवारी पासून नगरपालिकेत नोंदणी सुरू
करमाळा(दि.४): प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 सुरू होत असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी करमाळा नगरपरिषद हद्दीमधील नागरिकांनी सर्व आवश्यक ती कागदपत्रे घेऊन ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ज्ञानेश्वर वाचनालय करमाळा येथे उपस्थित रहावे असे आवाहन करमाळा नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे. तसेच यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा व पीएम स्वानिधी संदर्भात देखील यावेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याबाबत करमाळा परिषदेने परिपत्रक काढले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याच्या स्वतःच्या मालकी जागा असावी, भारतामध्ये लाभार्थी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांचे नावे पक्के घर नसावे, वार्षिक उत्पन्न मर्यादा तीन लाख रुपये असावी, तसेच लाभार्थ्याने गेल्या वीस वर्षात कोणत्याही शासकीय आवास योजनेचा लाभ घेतलेला नसावा अशा पात्रतेच्या अटी आहेत.
नवीन घरकुल नोंदणी ऑनलाईन करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे :
१. अर्जदाराचे आधार कार्ड मोबाईल लिंक असलेला.
२. कुटुंबातील सदस्यांचे आधार तपशील (आधार क्रमांक, आधारनुसार नाव, जन्म तारीख )
३. अर्जदार यांचे आई व वडिलांचे आधार कार्ड ( हयात नसल्यास मृत्यु प्रमाणपत्र)
४. अर्जदाराने आधारला लिंक असलेले सक्रिय बँक खाते तपशील (खातेक्रमांक, बँकेचे नांव, शाखा IFSC कोड)
५. उत्पन्नाचे चालू वर्षांचे प्रमाणपत्र ( तहसिलदार यांचे वार्षिक ३ लाखांपर्यंत)
६. जमीन दस्तऐवज (सिटी सर्व्हे उतारा )
७. करमाळा नगर परिषद मालमत्तापत्र चालू वर्ष व मालमत्ता कर पावती चालू वर्ष.
८. रेशनकार्ड
९. भारतात कुठेही पक्के घर नसल्याबाबत चे १०० /- रु. स्टॅम्पपेपर वर प्रतिज्ञपत्र व हमीपत्र.
१०. पि. एम. स्वानिधी, इमारत बांधकाम कामगार, पि.एम. विश्वकर्मा इ. योजनेचा लाभार्थी असल्यास नोंदणी क्र. प्रत आवश्यक आहे.
११. जातीचा दाखला (एससी / एसटी / ओबीसी )