करमाळा येथे ‘युवासेना चषक’ भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
करमाळा (दि.४) : नुकतेच करमाळा येथील गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब च्या वतीने 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान करमाळा येथील जिम मैदानावर क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आली होती. यानंतर पुन्हा एकदा जीन मैदानावर क्रिकेटचा थरार अनुभवायला क्रीडा प्रेमींना मिळणार आहे.
येत्या रविवारी दि. ९ फेब्रुवारी पासून गुरुवार दिनांक १३ फेब्रुवारी दरम्यान ‘युवासेना चषक’ या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा आयोजित केल्या केल्या असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
या स्पर्धेमध्ये जिंकणाऱ्या संघांना विविध पारितोषिके दिली जाणार आहे. प्रथम पारितोषिक एक लाख रुपयांचे असून शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्यावतीने पारितोषिक देण्यात येणार आहे. द्वितीय पारितोषिक ५१ हजार रुपयांचे असून शिवसेनेचे युवा नेते दिग्विजय बागल यांच्यावतीने ते देण्यात येणार आहे. तृतीय पारितोषिक ३१ हजार रुपयांचे (भरत अवताडे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस) तर चतुर्थ पारितोषिक २१ हजार रुपयांचे असून करमाळा येथील पवार हॉस्पिटल व सिद्धिविनायक हॉस्पिटल यांच्यावतीने देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विविध बक्षिसे दिली जाणार आहेत यामध्ये बेस्ट बॅट्समन ला बॅट बेस्ट बॉलरला शूज, मॅन ऑफ द सिरीजला – सायकल आदी विविध बक्षिसे दिली जाणार आहेत.
हे सर्व सामने जिन मैदान येथे खेळविले जाणार असून या सर्वांचे youtube वर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.