माघवारी निमित ह.भ.प. भरत महाराज गतीर यांच्या पायी दिंडीचे करमाळ्यात स्वागत
करमाळा(दि.५):- माघवारी यात्रे निमित पंढरपुर कडे जाण्याच्या ह.भ.प. भरत महाराज गतीर यांच्या पायी दिंडी चे करमाळा येथे माजी उपनगराध्यक्ष सोमनाथ चिवटे यांच्या निवासस्थानी स्वागत करण्यात आले.
गेल्या २३ वर्षा पासुन ते या दिंडीची सेवा करत आहेत. सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील ३ फेब्रुवारी रोजी पायी सोहळ्याचे आगमन करमाळ्यात झाले असता दिंडीच्या स्वागता साठी करमाळा तालुक्याचे तहसीलदार ठोकडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी अँड बाबुराव हिरडे, काका निंबाळकर, मस्कर तात्या, मारकड साहेब,पटेल बंधु, बाळु बलडोटा, लालित आगरवाल, यानिमिताने हभप दिनेश किरवे यांच्या किर्तनाचे अयोजन करण्यात आले होते. राशीन पेठ तरुण सेवा मंडळाच्या सर्व युवक वर्गाने यासाठी परिश्रम घेतले.