पोलीस भरती झालेल्या युवकांचा केम ग्रामस्थांकडून सत्कार

केम(संजय जाधव): केम येथील अक्षय दिनेश वायभासे व मलवडी येथील आदेश रविंद्र सातव यांची मुंबई येथे महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे. हे दोन्ही युवक शेतकरी कुटूंबातील आहेत. या यशामुळे त्यांच्यावर ग्रामस्थांकडून कौतूकाचा वर्षाव होत आहे.
अक्षय वाभासे याने येथे बी.कॉम मध्ये पदवीचे शिक्षण घेतले आहे. सध्या तो परभणी येथे आरोग्य विभागात नोकरीला आहे. पोलीस होण्याची त्याच्या मनातील इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. आरोग्य विभागात नोकरीला असताना त्याने पोलीस भरतीच्या परीक्षेची तयारी सुरू ठेवली. पहिल्याच प्रयत्नात त्याने हे यश मिळवले आहे. आदेश सातव याने १२ वीचे शिक्षण करमाळा येथील महात्मा ज्युनिअर काॅलेज मध्ये घेतले आहे. आदेशने देखील पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. या दोघांनी पोलीस भरतीसाठी हडपसर अकॅडमी मध्ये प्रवेश घेत तयारी केली होती.

या निवडीनंतर केम ग्रामस्थांच्यावतीने या दोघांचा शाल, श्रीफळ, हार,फेटा घालून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी उपसरप़च युवा नेते अजित दादा तळेकर माजी उपसरपंच नागनाथ तळेकर बाळासाहेब तळेकर,तानाजी वायभासे, सतीश खानट ज्यालींदर आबा तळेकर सुग्रीव शिंदे, दिलीप पठाण, तानाजी चांदगुडे, गणेश वायभासे पोपट तळेकर, नाना पाटिल शहाजी तळेकर, बाळु ननवरे मोळीक गुरूजी दत्ता शिंदे,गोसेवक परमेश्वर तळेकर,पांडूरंग वायभासे उपस्थित होते.





