शेटफळ येथे लबडे परिवाराच्यावतीने भागवत कथेचे आयोजन – भागवत कथा सोहळ्याला भाविकांमधुन उस्फुर्त प्रतिसाद..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : महाशिवरात्रीच्या पर्वकाळात शेटफळ तालुका करमाळा येथे सुरू असलेल्या भागवत कथा सोहळ्याला भाविकांमधुन उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून येथिल लबडे परिवाराच्या वतीने या भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
शेटफळ तालुका करमाळा येथे स्व. लोचनाबाई दगडू लबडे ,स्व. लक्ष्मीबाई महादेव लबडे व स्व. दगडू मारूती लबडे यांच्या स्मरणार्थ येथील प्रगतशील शेतकरी विलास लबडे यांच्या वतीने महाशिवरात्रीच्या पर्व व ग्रामदैवत नागनाथ महाराज यात्रा काळात श्रीमद् भागवत महाकथेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्यात मयूर महाराज मोरे करकंब पंढरपूरकर व त्यांचे सहकारी या कथेचे सादरीकरण करत आहेत. याशिवाय दररोज सकाळी ज्ञानेश्वरी अनुष्ठान सोहळा हरिपाठ हरी भजन असे धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. भागवथ कथेला गावातील भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून शेटफळ येथील ग्रामदैवत नागनाथ महाराज यांच्या यात्रेच्या दिवशी 27 फेब्रुवारी रोजी या कथेची सांगता होणार आहे.

यामध्ये शुकदेव महाराज यांनी परिक्षीती राज्याला शिक्षण सांगितलेल्या भागवत पुराणातील देवाच्या विविध अवतारांच्या कथा राम जन्मकथा कृष्ण जन्मकथा कृष्ण लीला आशा वेगवेगळ्या कथेचे उत्कृष्टपणे विवरण केले जात असून दररोज वेगवेगळ्या वेशभूषेतील पौराणिक पात्रांचे जिवंत देखावे सादर करून यामध्ये अधिकच रंगत भरली जात आहे गावातील भाविकां मधून या सोहळ्यासाऊ मोठा प्रतिसाद मिळत आहे.

आज पर्यंत या सोहळ्यामध्ये सुरुवातीला गजानन दर्शन, शंकर-पार्वती विवाह ,कृष्णजन्म सोहळा, कृष्ण रुक्मिणी विवाह सोहळा गोवर्धन पर्वत सोहळा असे जिवंत देखावे सादर करण्यात आले आहेत डॉ. सुहास लबडे राघवेंद्र लबडे व सर्व लबडे परिवाराच्या वतीने उपस्थित सर्वांचे स्वागत करण्यात येत आहे. उर्वरित कथा सोहळ्याला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन लबडे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.



