केम केंद्रामध्ये काॅपीमुक्त अभियान अंतर्गत दहावीची परिक्षा सुरू - Saptahik Sandesh

केम केंद्रामध्ये काॅपीमुक्त अभियान अंतर्गत दहावीची परिक्षा सुरू


केम(संजय जाधव):  केम (ता. करमाळा) येथे केंद्र क्रं ३०४३ मध्ये  काॅपीमुक्त अभियान अंतर्गत इयत्ता दहावीची परिक्षा  सुरळीतपणे सुरू आहे. या केंद्रावर एकूण २०० परिक्षार्थी आहेत. 

केम येथे दहावीचे दोन केंद्र आहेत. दुसरे केंद्र केंद्र क्रं ३०४९ राजाभाउ तळेकर प्रशाला येथे आहे. केंद्र क्रं ३०४३ मध्ये शा.गो.पवार, राजाभाउ तळेकर,नूतन माध्य, केम अजितदादा पवार वडशिवणे, आदिनाथ माध्य , भाळवणी, अवधूत विद्यालय वांगी,न्यू इंग्यलिंश स्कूल घोटि श्री छत्रपती संभाजी विद्यालय निंभोरे आदि शाळेतील परीक्षार्थी आहेत.

करमाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी जयदेव नलवडे व केम केंद्र प्रमुख महेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठे पथकाची नेमणूक केली आहे. काॅपीमुक्त अभियनामध्ये वर्गामध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविले आहेत. या परिक्षा काॅपीमुक्त अभियानतंर्गत पार पाडण्यासाठी केंद्र संचालक बेले एम.डी व उपकेंद्र संचालक तळेकर ए.एन काम पाहत आहे. तसेच परिक्षा पार व्यवस्थित पाडण्यासाठी कुंभार सर काळे सर परिश्रम घेत आहेत.

या केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणून पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!