उत्तरेश्वर देवस्थानला केमच्या भाविकाकडून दागिणे अर्पण

केम(संजय जाधव): केम (ता.करमाळा) येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर देवस्थानाला महाशिवरात्रीच्या मुहर्तावर, येथील व्यापारी योगेश गजानन वासकर यांच्याकडून श्रीस सव्वादोन लाख रूपये किमतीचे सोन्याचे गंठण व बाबासाहेब माणिक घाडगे यांच्याकडून १७५ ग्रॅम चांदिची कोर तर रागिणी सोलापूरे यांनी जास्वंदीची दोन चांदिची फुले अर्पण केली आहेत. हे दागिणे श्री उत्तरेश्वर देवस्थान कमिटीकडे सुपूर्द करण्यात आली.
या वेळी चेअरमन दादासाहेब गोडसे सचिव मनोज सोलिपूरे सदस्य विजय तळेकर समाधान गुरव ज्योती वासकर अॅड, मनोज वासकर, रोहन वासकर, गणेश शेटे उपस्थित होते या सर्व दानशूर भाविकांचे देवस्थान कमेटिच्या वतीने श्री उत्तरेश्वर देवस्थानची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

येथील श्री उत्तरेश्वर देवस्थान हे जागृत ग्रामदैवत आहे भाविक या देवाला नवस बोलतात त्यांची इच्छा पूर्ण झाल्यावर भाविक असे नवस फेडतात.





