करमाळा तालुका जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेमध्ये कमलाभवानी विकास पॅनलच्या १३ जागा विक्रमी मताने विजयी.. - Saptahik Sandesh

करमाळा तालुका जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेमध्ये कमलाभवानी विकास पॅनलच्या १३ जागा विक्रमी मताने विजयी..


करमाळा : करमाळा तालुका जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सन 2025 ते 2030 या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये श्री कमला भवानी विकास पॅनलचे सर्वच्या सर्व 13 जागा विक्रमी मताने निवडून आल्या आहेत.

या पतसंस्थेचे 250 सभासद असून, करमाळा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्वतःची दोन मजली इमारत असणारी तालुकास्तरावरील हि पहिली पतसंस्था आहे. पतसंस्थेचा कर्जाचा व्याजदर आठ टक्के असून, गतवर्षी संस्थेने सात टक्के लाभांश दिला होता. पतसंस्थेचे स्वतःचे भाग भांडवल चार कोटी आहे. सदर निवडणुकीमध्ये नूतन संचालक म्हणून सुशेन ननवरे, दादासाहेब केवारे, सूर्यकांत मोहिते, शिवाजी खंडागळे, जगन्नाथ भिसे, डॉ.मंगेश झोळ, दत्तात्रय जाधव, कुलदीप दौंड, वैभव माने, नितीन आलाट, पोपट फडतडे तसेच महिला प्रतिनिधी म्हणून श्रीमती सुवर्णा बोराडे व सुरेखा खोबरे या निवडून आले आहेत .कमला भवानी विकास पॅनलची 26 वर्षाची सत्ता सुशेन ननवरे यांच्या नेतृत्वाखाली आबादीत राहिल्याने सर्व सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!