निलज येथे छावा चित्रपट मोफत दाखविण्यात येणार

करमाळा / संदेश प्रतिनिधी : निलज (ता.करमाळा) येथील आदिनाथ तरुण मंडळाच्यावतीने आज (दि.४) रात्री ८ वाजता संभाजी महाराजांवरील छावा हा चित्रपट मोठ्या एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा धगधगता इतिहास सर्वांना समजावा या उद्देशाने हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी हा चित्रपट पाहण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.





