जागतिक महिला दिनानिमित्त जेऊर येथे महिला सन्मान रॅलीसह महिला महोत्सवाचे आयोजन : जोतीताई नारायण पाटील

करमाळा/ संदेश प्रतिनिधी : जागतिक महिला दिनानिमित्त जेऊर येथे महिला सन्मान रॅलीसह आजपासून महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन महिलांसाठी विविध स्पर्धा घेतल्या जाणार अशी माहिती सौ जोतिताई नारायण पाटील यांनी दिली. जेऊर येथे आमदार नारायण आबा पाटील मित्रमंडळ व ग्रामपंचायत जेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
उद्या पासून सुरू होणाऱ्या महिला महोत्सवात दिनांक 4 मार्च रौजी रांगोळी स्पर्धा, उखाणे स्पर्धा वफनी गेम्स तर दिनांक 5 मार्च रोजी अंताक्षरी , फनी गेम्स व गायन या स्पर्धा होतील तसेच 6 मार्च रोजी वेशभुषा व अभिनय स्पर्धा तसेच फनी गेम तर या दिवशी महिलांचे फ्रि बी एम आय चेक अप व आहारा विषयक मार्गदर्शन केले जाईल. दिनांक 7 मार्च रोजी पाककला स्पर्धा व वकृत्व स्पर्धा तसेच फनी गेम तर दिनांक 8 मार्च रोजी महिला सन्मान रॅलीसह डान्स स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
या सर्व स्पर्धा सुरज मोती फन्कशन हॉल (शिक्षक कॉलनी) जेऊर येथे होतील. या स्पर्धेसाठी समस्त महिला भगिनी नियोजक म्हणुन जबाबदारी पार पाडणार असुन जेऊर व परिसरातील समस्त महिलांनी या महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. आमदार नारायण आबा पाटील मित्रमंडळ व ग्रामपंचायत जेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महिला दिनाचे हे २३ वे वर्ष असून महिला दिनाचे आयोजन करण्याची इतकी दीर्घ परंपरा असलेला हा महोत्सव आहे.





