करमाळा येथील रशिदाबी कबीर यांचे निधन

करमाळा (दि.६): करमाळा येथील रशिदाबी शमसुद्दीन कबीर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ९१ वर्षे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली सुना नातवंडे पणतू असा मोठा परिवार आहे.
कमलादेवी औद्योगिक वसाहतीचे सचिव व दैनिक लोकमतचे करमाळा तालुका प्रतिनिधी, पत्रकार नासीर कबीर व करमाळा महसुल मंडल अधिकारी हुस्नोदिन कबीर यांच्या त्या मातोश्री होत.





