जेऊर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला

केम(संजय जाधव): जेऊर येथे मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आरोपीस फाशीची शिक्षा होण्यासाठी संभाजी ब्रिगेडने जेऊर बंद साठी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी व नागरिकांनी जेऊर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

यावेळी निवेदन स्वीकारताना तहसीलदार यांच्यावतीने प्रतिनिधी गाव कामगार तलाठी भाऊसाहेब सोन टक्के व पोलीस हवालदार ढेंबरे व शेख साहेब यांनी निवेदन स्वीकारले निवेदनास मागण्या खालील प्रमाणे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्या मागे सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. जे नेतेमंडळी अशा क्रूर आरोपींना पाठीशी घालणाऱ्या त्या नेतेमंडळीवर व तो कोणत्याही पक्षाचा असला तरी कठोरात कठोर कारवाई व्हावी. भविष्यात देशातील कुठल्याही शहरात व खेडेगावात असे खंडणीसाठी व इतर कुठल्याही बाबतीत असे अमानवीय क्रूर हत्या होऊ नये. अशा अमानवी क्रूर हत्या करणाऱ्यांना नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी. तसेच जेऊर ग्रामस्थांनी व व्यापारी वर्गानी जेऊर कडकडीत बंद ठेवून निषेध व्यक्त केला.

यावेळी उपस्थित निलेश पाटील, नितीन खटके, बाळासाहेब कर्चे,अतुल निर्मळ,अजिनाथ माने, धन्यकुमार गारुडे, सोमनाथ जाधव,सागर कोठावळे, अजय सोळंकी,बाळासाहेब तोरमल, प्रशांत लोंढे, सागर बनकर, सचिन गारुडी, नाथा गोडसे, उमेश मोहिते, वैभव मोहिते, नाना बोराटे, पोपट मोहिते, अविनाश घाडगे, विठ्ठल जाधव, माऊली सुतार, सुहास तावरे, श्रीकांत गावडे, दत्तात्रेय नलवडे, हनुमंत मोहिते हेमंत शिंदे आदि उपस्थित होतै





