केम येथे प्रसिध्द कवी इंद्रजित भालेराव यांचे ‘माय बाप दैवत आपुले” या विषयावर व्याख्यान आयोजित

करमाळा(दि.८) : सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांचा ‘माय बाप दैवत आपुले ” हा कार्यक्रम दि. १२ मार्च रोजी सायंकाळी ६ वा. शिवशंभु प्रवेशद्वार आयोजित करण्यात आला आहे.

केम येथील जनार्दन तर्कसे (काका ) यांच्या 95 वा वाढदिवसा निमित्त व कै. प्रमिला जनार्दन तर्कसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमास आमदार नारायण आबा पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, मिरज विद्या समितीचे अध्यक्ष
शैलेशदादा देशपांडे, जनता सह बँकेचे चेअरमन दिलीप दादा तळेकर या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होतं आहे.





