रावगांव येथे महिला दिन साजरा

करमाळा (दि.८) – रावगांव (ता. करमाळा) येथे प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, व अहिल्यादेवी होळकर , यांच्या प्रतिमेचे पूजन जि. प . प्रा. शाळेतील शिक्षिका रोहिणी चव्हाण – बरडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे बोलताना म्हणाले की, सामाजिक जीवनात पुरुषा प्रमाणेच महिलाही मोलाचे योगदान देतात परंतु अनेक ठिकाणी पुरुषाप्रमाणेच महिलांना समान अधिकार दिले जात नाही. समाजासाठी महिलांनी दिलेले योगदानाचे महत्त्व समजण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना समान अधिकार देण्याच्या उद्देशाने ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रियंका कांबळे ,प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या सचिवा सौ .शितल कांबळे,सौ. रोहिणी चव्हाण-बरडे मॅडम, सौ.विद्या गंभीर-शिंदे मॅडम, कु. कोमल काळुंखे मॅडम, सौ .पल्लवी पवार सौ .द्रौपदी जाधव सौ. दिपाली कांबळे सौ .शोभा पवार, आदीसह महिला व पदाधिकारी उपस्थित होते.






