उंदरगावचे सरपंच युवराज मगर यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान

करमाळा (दि.९) : तालुक्यातील उंदरगावचे सरपंच युवराज विक्रम मगर यांना किल्ले तोरणा शिवशंभु संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आदर्श सरपंच हा पुरस्कार देण्यात आला आहे. शुक्रवार दि.७ मार्च रोजी तोरणा गडावर हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडला. मगर यांच्या सामाजिक, शैक्षणिक, गावातील विविध विकास कामे पाहून त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.






