करमाळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न -

करमाळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न

0

करमाळा (दि.४): शहरातील सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा नुकताच यथोचित सन्मान करण्यात आला. हा सत्कार सोहळा भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाउंडेशन आणि सकल मुस्लिम समाज करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमात मुस्लीम समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक व निवृत्त शिक्षक हाजी लालुमिया शेख यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच दिव्य मराठीचे पत्रकार विशाल घोलप आणि गजानन स्पोर्ट्स क्लबचे मार्गदर्शक समीर बागवान यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने सन्मान करण्यात आला.

राजकीय क्षेत्रात नुकतीच आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड झालेल्या अॅड. राहुल सावंत, डॉ. अमोल घाडगे आणि राजाभाऊ कदम यांचा सत्कार करण्यात आला. नगरसेवक संजय सावंत यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेऊन त्यांचाही गौरव करण्यात आला.

प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले करमाळा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार माजीद काझी आणि आदिनाथ साखर कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी जाकीर शेख यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी जमियत उलेमा हिंदचे तालुकाध्यक्ष मौलाना मोहसिन, आयशा मस्जिदचे मुफ्ती अबुरेहान, ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर, नेते फारुख जमादार, अॅड. नईम काझी, पत्रकार अशफाक सय्यद, आलिम शेख, कदीर बडेभाई, समीर शेख, सकल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जमीर सय्यद, समीर बागवान, प्रा. इब्राहिम मुजावर, रमजान बेग, सुरज शेख, साजिद बेग, जावेद सय्यद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात मुस्लिम समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

सुलेखन– प्रशांत खोलासे, केडगाव(ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!