कोळगाव सब स्टेशनच्या क्षमतेत वाढ करण्यात यावी- चिवटे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन -

कोळगाव सब स्टेशनच्या क्षमतेत वाढ करण्यात यावी- चिवटे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

0

करमाळा (दि.११): कोळगाव सब स्टेशनवरून पाच गावांना वीजपुरवठा केला जातो. मात्र, मंजूर क्षमतेच्या तुलनेत सध्या केवळ ३.५ KVA क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर कार्यरत असल्यामुळे पुरेसा दाब मिळत नाही. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर ५ KVA क्षमतेचा करावा आणि दोन अतिरिक्त ब्रेकरची तातडीने सोय करावी, अशी मागणी भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

चिवटे यांनी नुकतीच पालकमंत्री गोरे यांची भेट घेऊन कोळगाव सब स्टेशनचा वीजप्रश्न निकाली काढण्याची विनंती केली. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचे वरिष्ठ अभियंता माने यांच्याशी संपर्क साधून हा प्रश्न तातडीने सोडवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती चिवटे यांनी दिली.

दरम्यान, करमाळा तालुक्यातील कोळगाव सब स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाच ते सहा गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने आणि आठ तासांच्या ऐवजी केवळ सहा तास वीजपुरवठा होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर या गावांतील शेतकऱ्यांनी गणेश चिवटे यांची भेट घेऊन त्यांच्या शेतीसंबंधीच्या समस्येच्या सोडवणुकीची मागणी केली होती

.याबाबत प्रतिक्रिया देताना श्री. चिवटे म्हणाले, “कोळगाव स्टेशनवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान थांबावे यासाठी आम्ही पालकमंत्र्यांना निवेदन दिले होते. त्यानुसार, सहा तासांवरून पुन्हा आठ तास पूर्ण दाबाने वीजपुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लवकरच हे काम पूर्ण होईल व शेतकऱ्यांचे नुकसान थांबेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!