बनसोडे यांची सहाय्यक उपनिरीक्षक पदी पदोन्नती

करमाळा ता.१६: आळसुंदे येथील नागनाथ बलभिम बनसोडे हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला मध्ये दिल्ली येथे अनेक वर्षापासून सेवेत होते. नुकतीच त्यांची पदोन्नती झाली असून त्यांची सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या या पदोन्नती बद्दल आळसुंदे ग्रामस्थांच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.






