केममध्ये पारंपरिक थाटात काढण्यात आली संभाजी महाराजांची भव्य मिरवणूक -

केममध्ये पारंपरिक थाटात काढण्यात आली संभाजी महाराजांची भव्य मिरवणूक

0

केम(संजय जाधव): केम (ता. करमाळा) येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पारंपरिक मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. ही मिरवणूक २१ मे रोजी केम गावातून काढण्यात आली.

या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पूजनानंतर सजवलेल्या रथात आणि पालखीत महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली. शिवशंभो वेशीपासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. तब्बल पाच तास चाललेल्या या मिरवणुकीत विविध पारंपरिक वाद्यवृंद आणि देखावे सहभागी झाले होते. करमाळ्याचे दोस्ती बँड, रेणुका देवी सन इ., वाद्यमार्गदर्शक पाटील खडूस, श्री उत्तरेश्वर हलगी ग्रुप, केम येथील बजरंग बली देखावा यांचा मिरवणुकीत सहभाग होता.

यासोबतच कन्हेरगाव येथील अकरा घोडे, त्यावर अश्वारूढ झालेले मावळे हे विशेष आकर्षण ठरले. शंभू भक्तांच्या हातात हिंदू धर्म प्रसारक फलक होते. मिरवणुकीत शेकडो भक्तांनी सहभाग घेतला होता. संपूर्ण केम नगरी शंभू भक्तांनी फुलून गेली होती.

यावर्षी केम येथे प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर, रेकार्ड ब्रेक मिरवणूक झाली. मिरवणूक नियोजित ठिकाणी पोहोचल्यावर राजे शिवछत्रपती महाराज यांची आरती करण्यात आली आणि सोहळ्याची सांगता करण्यात आली.
या मिरवणुकीसाठी शंभू भक्तांनी रात्रंदिवस मेहनत घेतली आणि एक आगळावेगळा उत्सव साकार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!