कृषिमंत्री कोकाटे यांचा शेलगाव, कंदर येथे आज भेट दौरा

करमाळा(दि.२५): महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते करमाळा तालुक्यातील विविध कृषी प्रकल्पांनाही भेट देणार आहेत.
आज सायंकाळी ५:३० वाजता ते जेऊर येथील फळरोपवाटिका व शेलगाव-वांगी येथील केळी संशोधन केंद्रास कृषिमंत्री भेट देतील. सायंकाळी ६.३० वाजता ते कंदर येथे पोहोचतील. तेथे केळी निर्यातदार किरण डोके यांच्या फळ पॅकहाऊस, कोल्ड स्टोरेज व प्री-कूलिंग युनिटची पाहणी केली जाणार आहे.






