प्रवाशांच्या सोयीसाठी विविध ३ रेल्वे गाड्यांना केम स्थानकावर थांबा देण्याची मागणी

केम (संजय जाधव): करमाळा तालुक्यातील केम रेल्वे स्थानकावर पुणे – सोलापूर – पुणे (दैनंदिन गाडी) क्र.12169/12170, हडपसर काझी पेट (साप्ताहिक गाडी) क्र. 17013/17014 पुणे-अमरावती-पुणे (साप्ताहिक गाडी) क्र 114055/11406 या रेल्वेगाड्याना थांबा मिळावा अशी मागणी प्रवाशांच्या वतीने सरपंच सौ सारिका कोरे यांनी केली असून या संदर्भात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामार्फत रेल्वे विभागाला निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, केम हे गाव करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे असून कुंकू वा साठी देशभरात प्रसिद्ध आहे या गावची लोकसंख्या सुमारे पंधरा हजारांच्या आसपास असून केम परिसरातील आठ गावची आवक जावकर केमवर अवलंबून आहे. केम येथील रेल्वे स्थानकावर मर्यादित प्रवासी गाड्या ना थांबा आहे. सोलापूर ला जाणारी सकाळच्या सत्रात गाडी नाही. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय सोय होत आहे पुणे अमरावती या गाडीला थांबा मिळाल्यास कुंकू कारखानदारांची सोय होईल कुंकू कारखान्यांसाठी लागणारा कच्चा माल अमरावती येथून येतो. कारखानदारांना अमरावतीला नेहमी जावे लागते तसेच नांदेड,लातुरला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होईल तरी रेल्वे प्रशासनाने या मागणीचा विचार करून वरील गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.





