करमाळा वकील संघाची परंपरा गौरवास्पद – न्यायाधीश संजय घुगे

करमाळा, दि. ९ जून: करमाळा वकील संघाची परंपरा अत्यंत उत्तम असून, वकिलीबरोबरच न्यायदान क्षेत्र गतिमान व्हावे यासाठी वकील संघाचे योगदान महत्त्वाचे आहे. समाजातील सर्वसामान्य घटकांशी नाळ जुळवत, सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणारा वकील संघ म्हणून करमाळा संघ ओळखला जातो, असे मत वरिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश संजय घुगे यांनी व्यक्त केले.

करमाळा न्यायालयात नव्याने नियुक्त झालेले न्यायाधीश अमित शर्मा यांच्या स्वागत समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. रवींद्र बरडे हे होते.
न्यायाधीश घुगे पुढे म्हणाले की, “गेल्या चार महिन्यांपासून करमाळा न्यायालयात काम करत असून, या कालावधीत वकील संघाने दिलेले सहकार्य हे अद्वितीय व उल्लेखनीय आहे. भविष्यातही असंच सहकार्य अपेक्षित आहे. वकील संघाच्या अडचणींसाठी माझं दालन सदैव खुलं राहील.”

या स्वागत सोहळ्यात अध्यक्ष ॲड. बरडे ,उपाध्यक्ष ॲड.सुनील रोकडे, ऍड. सविता शिंदे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. एस. पी. लुणावत, ऍड. कमलाकर वीर, आणि ऍड. डॉ. बाबुराव हिरडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ऍड. विनोद चौधरी यांनी केले; तर आभार प्रदर्शन ऍड. सुनील रोकडे यांनी केले. कार्यक्रमाला वकील संघाचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.


“मी या क्षेत्रामध्ये सर्वसामान्य नागरिकांना विनाविलंब न्याय मिळावा यासाठी आलो आहे. त्यासाठी माझे काम गतिमान राहणार आहे. सर्वसामान्य लोकांसाठी शेवटचा पर्याय न्यायालय असतो. तेव्हा न्यायालयात आल्यानंतर त्यांना विलंब न होता लवकरात लवकर न्याय कसा मिळेल यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहणार आहे.वकील संघाच्या सर्व सदस्यांनी या कार्यात मला सहकार्य करावे. वकील संघाच्या कोणत्याही समस्या असतील तर माझं दालन वकील संघासाठी कायम खुलं राहणार आहे.”
— न्यायाधीश अमित शर्मा,



