नितीनकुमार कांबळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

करमाळा (दि. 2) : बी द चेंज फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार यंदा दिगंबररावजी बागल विद्यालय, सावडी येथील हिंदी व क्रीडा मार्गदर्शक शिक्षक नितीनकुमार दिगंबर कांबळे यांना प्रदान करण्यात आला.

राज्यभरातून शिक्षकांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यातून कांबळे सरांची पुरस्कारासाठी निवड झाली. हा गौरव सोहळा रविवार, दि. २९ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता नगर-मनमाड रोडवरील साई पालखी निवारा, निघोज, शिर्डी येथे संपन्न झाला.

कार्यक्रमास राज्य आदर्श ग्राम योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. पोपटराव पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कांबळे सरांचा सहकुटुंब सन्मान करण्यात आला.






