कंदर येथे कृषीकन्यांकडून कृषी दिन व कृषी सप्ताह साजरा

कंदर (संदीप कांबळे): कण्वमुनी विद्यालय व ज्युनियर कॉलेज, कंदर येथे भारताचे पहिले कृषी मंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सद्गुरु कृषी महाविद्यालयातील कृषीकन्यांकडून कृषी दिन आणि कृषी सप्ताह साजरा करण्यात आला.

दि. १ ते ७ जुलै या कालावधीत कृषी सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये वृक्षारोपण, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा आदी कार्यक्रमांचा समावेश होता. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण आणि कृषीविषयक जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमासाठी कंदर गावचे सरपंच मा. मौला मुलाणी, उपसरपंच मा. उदयसिंह शिंदे, तसेच विद्यालयाच्या प्राचार्या सौ. सुनिता कदम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे संस्थापक मा. डॉ. शंकरराव नेवसे, संस्थेचे पदाधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे सर यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रम समन्वयक प्राचार्य सी. बी. माने सर, कार्यक्रम अधिकारी एस. आर. चाकने मॅडम यांच्यासह इतर तज्ज्ञांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या संपूर्ण सप्ताहाच्या अनुभवाविषयी कृषीकन्या तन्वी ढवळे, समृद्धी क्षिरसागर, स्वप्ना माने, वृषाली राऊत आणि प्रतीक्षा सोनवणे यांनी समाधान व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले.



