केम येथे जागतिक लोकसंख्या दिन साजरा

केम(संजय जाधव):श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपक्रमशील शिक्षक श्री गणेश जाधव हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री माधव बेले हे उपस्थित होते.
यावेळी श्री गणेश जाधव यांनी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त भारतातील वाढती लोकसंख्या आणि बेरोजगारी या विषयावर प्रकाश टाकला. लोकसंख्या वाढीमुळे सामाजिक गुन्हेगारी, भ्रष्टाचार वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. प्राचार्य श्री माधव बेले यांनी लोकसंख्या वाढीचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, पर्यावरण क्षेत्रामध्ये होणारे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे, प्रा.डॉ.संतोष साळुंखे, प्रा. एस.के.पाटील, प्रा.संतोष रणदिवे, प्रा.सतीश बनसोडे यांनी परिश्रम घेतले