केम जि.प.शाळेतील तीन विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र

केम (संजय जाधव): सन 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत केंद्रशाळा केम येथील तीन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत शिष्यवृत्ती पटकावली आहे.
शिष्यवृत्ती प्राप्त करणारे विद्यार्थी:
1️⃣ आदित्य कमलेश जांभळे – 84%
2️⃣ उत्कर्ष सतीश तळेकर – 80.66%
3️⃣ अमरसिंह चंद्रकांत तळेकर – 78.66%
या यशामागे मार्गदर्शन करणारे शिक्षक म्हणजे वर्गशिक्षिका श्रीमती कांचन हिवरे आणि उपशिक्षक श्री तुकाराम तळेकर यांचे मोलाचे योगदान राहिले.
गटशिक्षणाधिकारी जयवंत नलावडे, केंद्रप्रमुख महेश्वर कांबळे, विस्तार अधिकारी नितीन कदम, मिनीनाथ टकले, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंदाकिनी तळेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब तळेकर, उपाध्यक्ष सौ. पूजा धर्मराज, व सर्व सदस्य, तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचेही अभिनंदन केले.