श्रीदेवीचामाळ येथील दिनेश सोरटे यांचे निधन

करमाळा (दि. २०) : श्रीदेवीचामाळ (ता. करमाळा) येथील रहिवासी दिनेश बाळासाहेब सोरटे (वय ४३) यांचे काल शनिवारी (दि. १९) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. ते सार्वजनिक बांधकाम विभागातील माजी कर्मचारी बाळासाहेब सोरटे यांचे चिरंजीव होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने देवीचामाळ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.