आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत मुथा अबॅकस चे 85 विद्यार्थी सहभागी

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : येथील प्रचलित व नेहमी आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रमाचा उच्चांक मिळवणारे मुथा अबॅकस व वैदिक मॅथ अकॅडमीचे 85 विद्यार्थी 26 व 27 जुलै रोजी होणाऱ्या ऑनलाईन ॲरीस्टो किड्स आयोजित परीक्षेत सहभागी होत आहेत.
या परीक्षेची तयारी विद्यार्थी मॉक टेस्ट च्या माध्यमातून एक ते दीड महिना अगोदर पासून करत आहेत .त्यामध्ये अबॅकस, वैदिक math व शाब्दिक उदाहरणे या सर्व परीक्षेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत विविध जिल्ह्यातून राज्यातून व देशातून 2700 विद्यार्थी या परीक्षेसाठी सहभागी आहेत.

मुथा अकॅडमी च्या विद्यार्थ्यांना डॉ. अमोल घाडगे यांनी शुभेच्छा दिल्या. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना चार ते पाच मिनिटात 100 गणिते सोडवणे बंधनकारक आहे व हे प्रॅक्टिस च्या माध्यमातून शक्य आहे . शोभा शिंदे मॅडम, सोनाली ढवळे मॅडम, सौ विद्या शिंदे मॅडम, पूजा शिंदे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जेऊर इरा पब्लिक स्कूल मधूनही विद्यार्थी सहभागी आहेत.

सहभागी विद्यार्थी आराध्या पारख, आर्यन राखुंडे, वेदांत वारे, सई पडवळे, सार्थक वनारसे, साद बागवान, शरयू फरतडे, तन्मयी चोपडे, ओजस गांधी, प्रणील वैद्य, खुशी शहा, स्वरा पडवळे, स्वानंद मोरे, शिवतेज जाधव, साॅलेहा डाळवाले,श्रावणी गवळी, वीरप्रताप चौधरी, वेदांत रोडे, स्वराज तकिक, शर्विल माने, संस्कृती रोकडे, अथर्व तकिक, श्रुती मोरे, प्रज्वल सातव, श्रेयस शिंदे, ऋषिराज लष्कर, मयंक गवळी, अब्दुल्ला दाळवाले, अभिराज यादव, अनुजा भोसले, वरद बोऱ्हाडे शंभुराजे शिंदे, राजवी मोरे, देवांशी शिंदे, देवांश गलांडे, आरुष बनसोडे, , , आदित्य दुधे, श्लोक दुग्गड, विराज दुग्गड, रिद्धी शिंदे, आर्यन जाधव, धैर्य शिंदे, समर्थ सूर्यवंशी, पृथा पुराणिक, भार्गवी पुराणिक, पार्थ पुराणिक, स्वरा सूर्यवंशी, शिवम सूर्यवंशी, शर्वरी शिंदे, कौशल पुराणिक, आदित्य सोनी, शौर्य शिंदे, आदिती खरात, सानवी राठोड, शिवराज ढवळे, ऋचा काळे, प्रणव उकंडे, ध्रुव पुराणिक, मनस्वी वारे, साई काळे, मधुरा बागल, शिवम ढवळे,ध्रुव काळे, मानसी गाडेकर, कार्तिक शिंदे, श्लोक मत्रे, मैत्रेय सुरवसे, सम्यक अवसरे, केतकी कुलकर्णी, सिध्दीक बागवान.
या सर्व विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या संचालिका ज्योती मुथा, स्मिता वनारसे, राणी सावंत, गौरी गवळी या सर्वांनी मार्गदर्शन केले.

