सैनिक म्हणजेच माणसातील देव!" – डॉ. हिरडे -

सैनिक म्हणजेच माणसातील देव!” – डॉ. हिरडे

0


करमाळा (दि. २५) – “समाजात देव शोधायला गेलो, तर देव मंदिरात नाही, तो माणसात आहे… आणि त्यातही खरा देव म्हणजे सैनिक!” अशा भावस्पर्शी शब्दांत संत साहित्याचे अभ्यासक, डॉ. ॲड. बाबूराव हिरडे यांनी  व्यक्त केले.

कारगिल विजय दिनानिमित्त करमाळा तालुका आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. हिरडे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  डॉ. निलेश मोटे, डाॅ.अजय तोरड, पत्रकार विवेकराव येवले,  कॅप्टन विलास नाईकनवरे, माजी सैनिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अक्रूर शिंदे, कल्याणराव साळुंके, इंग्लिश असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष लावंड, पत्रकार गजेंद्र पोळ,कांतीलाल ताडे  हे होते.

पुढे बोलताना डॉ. हिरडे म्हणाले  की,”सैनिक हा आपला परिवार, गाव, सोडून सीमेवर छातीची ढाल बनून देशाचे संरक्षण करतो – यापेक्षा वेगळा देव कोण?” असे उद्गार त्यांनी काढले. आपल्या भाषणात त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा संदर्भ देत सैनिकांची तुलना देवाशी केली व माजी सैनिकांच्या न्यायालयीन कामकाजात वकील शुल्क घेणार नाही हे जाहीर केले.

यावेळी मेजर विलास  नाईकनवरे ,लावंड सर, मेजर किरण ढेरे व विवेकराव येवले, सचिन नवले यांची भाषणे झाली. तर डॉ.मोटे यांनी सैनिक परिवारातील महिलांची मोफत तपासणी करू असे जाहीर केले.

यावेळी सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या माता आणि पत्नी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेले आंतरराष्ट्रीय कृषिभूषण पुरस्कार विजेते रणजीत निंबाळकर, वृक्ष संवर्धनासाठी प्रसिद्ध काकासाहेब काकडे,
कारगिल युद्धातील योगदानासाठी अरविंद कोकाटे व आनंदराव पवार, बेस्ट एनसीसी कॅडेट सुमित घाडगे, आदर्श इंग्रजी शिक्षक विठ्ठल रोडगे,
बहुजन पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष आशाताई चांदणे,संघर्ष न्यूजचे सिद्धार्थ वाघमारे,
कारगिल स्मृती पुरस्कार विजेते फुलचंद मिसाळ,विशेष युवा पुरस्कार नवनाथ नाईक नवरे,सेवाभावी कार्यासाठी बाबासाहेब बोलभट,पत्रकार गजेंद्र  पोळ,आबासाहेब  झिंजाडे यांचे सत्कार केले.

प्रास्ताविक सैनिक संघटनेचे अध्यक्ष आक्रूर शिंदे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. समाधान कोळेकर आणि मेजर ढेरे यांनी केले.

देशभक्तीपर गीत सादर करणाऱे प्रवीणकुमार अवचर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावैळी सैनिकांच्या त्यागाची आणि वीरता-सन्मानाची  भावना उपस्थितांच्या अंत:करणावर कोरली गेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!