डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अभ्यासिका सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन -

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अभ्यासिका सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0

करमाळा (प्रतिनिधी) – भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन, करमाळा व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरचे निवासी जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी सचिन नराळे यांना महत्त्वपूर्ण निवेदन देण्यात आले. या निवेदनात जेऊर, कंदर आणि करमाळा शहरातील सुलेमानी मस्जिद येथे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी, यूपीएससी तसेच पोलीस भरती परीक्षांसाठी विशेष अभ्यासिका सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या अभ्यासिकेकरिता आवश्यक असणारे फर्निचर आणि स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून देण्याची विनंती निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन सकल मुस्लीम समाजाचे अध्यक्ष जमीर सय्यद यांच्या हस्ते सादर करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे व इतर उपस्थित होते..

या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष समीर शेख (कंदर), अॅड. असिम जहागिरदार, मिनाज जहागिरदार, हाशमोद्दीन तांबोळी, जेऊरचे मलंग शेख, रमिज शेख, इकबाल शेख, अयुब शेख, करमाळा येथील ओबीसी ऑर्गनायझेशनचे तालुकाध्यक्ष अॅड. नईम काझी, अॅड. अलिम पठाण, सनराईज क्लासेसचे प्रा. इब्राहिम मुजावर, झरे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य अकबर मुलाणी यांच्यासह रोहित पवार फाउंडेशनचे सदस्य मुस्तकीम पठाण, माहिती अधिकार कार्यकर्ते अलीम खान, रमजान बेग, सुरज शेख, जहाँगीर बेग, जावेद सय्यद, अरबाज बेग, शाहीद बेग, कलीम शेख, फिरोज बेग, कलंदर शेख, समीर बागवान, आरिफ खान, सोहेल पठाण, सुपरान शेख, अफजल शेख आदींच्या सह्या आहेत.

या उपक्रमामुळे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत पुढे जाण्यासाठी निश्चितच प्रोत्साहन मिळणार असून, सामाजिक समावेश आणि शैक्षणिक प्रगतीसाठी हा एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!