राज्यातील पहिले कारगिल भवन करमाळ्यात साकारणार - शिंदे यांची माहिती -

राज्यातील पहिले कारगिल भवन करमाळ्यात साकारणार – शिंदे यांची माहिती

0

करमाळा (दि. २८): राज्यातील पहिले कारगिल भवन करमाळ्यात साकार होत असल्याची माहिती आजी-माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष अक्रूर शिंदे यांनी दि.२६ जुलै रोजी साजरा होणाऱ्या कारगिल विजय दिनानिमित्त बोलताना दिली आहे.

यावेळी बोलताना शिंदे हे म्हणाले, माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी कारगिल भवन इमारत व कंपाउंड वॉल बांधण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी नाविन्यपूर्ण योजनेमधून शासनाकडून मंजूर करवून घेतला व या कामाचे भूमिपूजनदेखील दि.१६ ऑगस्ट २०२४ रोजी समारंभपूर्वक झाले होते पण काही अडचणींमुळे हे काम सुरू होण्यास विलंब झाला होता. मात्र आता हे काम प्रगतीपथावर असून सध्याच्या न्यायालयासमोर कारगिल भवनची इमारत साकार होत असून या कारगिल भवनमध्ये मिटिंग कम फंक्शन हॉल,कार्यालयासाठी ऑफिस रूम,स्वच्छतागृह आदी सुविधा असणार आहेत.

कारगिल भवनमुळे तालुक्यातील आजी-माजी सैनिकांना मीटिंग, मिळणाऱ्या सुविधा, पेन्शन, फॅमिली पेन्शन आणि कार्यक्रम, विविध योजनां विषयी चर्चा करण्यासाठी लाभ होईल आणि विविध समारंभांच्या निमित्ताने एकत्र येण्याची हक्काची सोय

यावेळी माजी सैनिक श्री, किरण ढेरे,श्री बाबासाहेब बोलभट, श्री रवींद्र सवासे, श्री बिभीषण कन्हेरे,श्री शिवाजी भंडारे, श्री गोपीनाथ हाके, श्री राव तात्या शिंदे, श्री सुरेश आदलिंग,श्री सुनील दौंडे, श्री शंकर शिंदे, श्री मणेश पाटील आणि आजी माजी सैनिक कल्याणकारी मंडळ करमाळा संचालक, सभासद आणि सर्व टीम  संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!