उत्तरेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा; २ कोटी निधीतून विकास कामांना सुरुवात

केम (संजय जाधव): केम (ता. करमाळा) येथील श्री ऊत्तरेश्वर देवस्थानला शासनाकडून तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा प्राप्त झाला असून, या तीर्थक्षेत्रासाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी पहिला हप्ता दोन कोटी रुपयाचा मिळाला असून या निधीतून विविध विकास कामांची सुरुवात २९ जुलै रोजी करण्यात आली. या कामांचे उदघाटन श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे,माजी सरपंच अजित तळेकर,महंत जयंतगिरी गिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

या विकास कामांचे उद्घाटन श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे, माजी सरपंच अजित तळेकर व महंत जयंतगिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले. भक्तनिवास, महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र सुविधा, मंदिरासमोरील सिमेंट रस्ता, पेव्हींग ब्लॉक, रिटेनिंग वॉल, स्ट्रीटलाईट्स आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांचा समावेश असलेल्या विविध कामांसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे सचिव मनोज सोलापूरे यांनी दिली.


या तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी माजी सरपंच अजित तळेकर, माजी जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार नारायण पाटील यांनी विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आले असून देवस्थानच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.


ऊत्तरेश्वर देवस्थानला शासनाकडून तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने देवस्थाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुरवातीच्या टप्प्यात २ कोटी निधी मिळाला असून यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. उर्वरित निधीसाठीही आम्ही पाठपुरावा करणार आहोत. – अजित तळेकर, माजी सरपंच, केम
या वेळी ट्रस्टचे सदस्य विजय तळेकर, अरुण येवले, मोहन दौंड, भाऊसाहेब बिचितकर, श्रीहरी तळेकर, गुरूजी रंदवे, राहुल कोरे कुंभार महाराज, बाळू ननावरे, राजेंद्र दौंड, भैरू शिंदे, दाऊद शेख, माऊली तळेकर, प्रकाश कोरे, विलास तळेकर, संग्राम तळेकर, श्रीमंत बोंगाणे, संदीप गोडसे, ब्रह्मदेव दौंड व पत्रकार संजय जाधव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


