अजित पवार व संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त निराधारांना स्नेहभोजन वाटप

करमाळा (दि.१ ऑगस्ट) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (२२ जुलै) आणि करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे (३१ जुलै) यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम प्रतिष्ठान करमाळा येथे निराधार ज्येष्ठ नागरिकांना स्नेहभोजन वाटपाचा उपक्रम संपन्न झाला.

हा उपक्रम जमीर सय्यद – कार्याध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस, सोलापूर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भरतभाऊ अवताडे, युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, नितीनराजे भोसले यांच्या हस्ते अन्नदानाने करण्यात आली.

मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिनभाऊ काळे, अॅड. अजित विघ्ने, सुजित तात्या बागल, बोरगावचे सरपंच विनय काका ननवरे, अशपाकभाई जमादार, अरबाज पठाण, तसेच अनेक महिला भगिनी आणि ग्रामीण-शहरी भागातील अल्पसंख्याक प्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमात अनेक वृद्ध, निराधार नागरिकांना प्रेमपूर्वक जेवण देण्यात आले. उपस्थित वृद्धांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे मन:पूर्वक आभार मानले. हा उपक्रम सामाजिक भान ठेवून राबविल्याबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


