पात्र शेतकऱ्यांनी ‘बांधावर नारळ लागवड’ योजनेचा लाभ घ्यावा – तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचे आवाहन -

पात्र शेतकऱ्यांनी ‘बांधावर नारळ लागवड’ योजनेचा लाभ घ्यावा – तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचे आवाहन

0

करमाळा : “बांधावर नारळ लागवड ही एक उत्कृष्ट संकल्पना असून, पात्र शेतकऱ्यांनी याचा नक्कीच लाभ घ्यावा,” असे आवाहन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी केले. बिटरगाव श्री येथे राज्य सरकारच्या १५० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेद्वारे ‘जिथे ऊस तिथे बांधावर नारळ लागवड’ या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला.

या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी अमर अडसूळ, मंडल अधिकारी श्री. बनसोडे, करमाळा पंचायत समितीचे सहायक कार्यक्रम अधिकारी हनुमंत राजपूत, तांत्रिक सहायक शिवकुमार यादव, सहायक कृषी अधिकारी दादासाहेब नवले, पोलिस पाटील शोभा अभिमन्यू, पत्रकार अशोक मुरूमकर, सामाजिक कार्यकर्ते बबनराव मुरूमकर, गजेंद्र बोराडे, माजी सरपंच डॉ. अभिजित मुरूमकर, दौलत वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

करमाळा तालुक्यातील वडगाव व बिटरगाव श्री ही दोन गावे या उपक्रमासाठी निवडण्यात आली आहेत. यामध्ये गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या बांधावर नारळ लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दोन ग्रामपंचायती निवडून हा उपक्रम राबवण्यात येत असून उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही सुरू आहे.

या उपक्रमाच्या प्रारंभाला बिटरगाव श्री येथे सीआरए (Climate-Resilient Agriculture) तंत्रज्ञानावर आधारित नारळ लागवड करण्यात आली. हवामानातील बदलांचा शेतीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन कमी पाण्यात टिकणारी व उत्पादनक्षम शेती करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी एक आशादायक पर्याय ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!