अल्पसंख्याक खात्याची जबाबदारी अजित पवार यांनी घ्यावी - मुस्लिम समाजाची मागणी -

अल्पसंख्याक खात्याची जबाबदारी अजित पवार यांनी घ्यावी – मुस्लिम समाजाची मागणी

0

करमाळा(दि. ३): नुकतेच कॅबिनेट मंत्री दत्तात्रेय भरणे यांना राज्याचे कृषिमंत्री पद दिले असल्याने सध्या त्यांच्या ताब्यात असलेले अल्पसंख्याक विकास आणि औकाफ खात्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः कडे घ्यावी अशी विनंती मुस्लीम समाजाकडून करण्यात येणार असल्याची माहिती सकल मुस्लीम समाज करमाळाचे अध्यक्ष व सोलापूर जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे कार्याध्यक्ष जमीर सय्यद यांनी माध्यमांना दिली.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, अजितदादा पवार यांनी आत्तापर्यंत मुस्लीम समाजातील मौलाना आझाद आर्थिक महामंडळची व्याप्ती 500 कोटी वरुन 1000 हजार कोटी वाढवली आहे, बार्टी,सारथी, या सारख्या संस्थाच्या धर्तीवर मौलाना आझाद शैक्षणिक व आर्थिक महामंडळची धर्तीवर मार्टी सारखी संस्था स्थापन करण्याची मंजुरी दिली आहे, अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी यांना शैक्षणिक कर्ज किंवा समाजातील लोकांना उद्योजक होण्यासाठी अल्प दरात दिलेले कर्ज, समाजातील मुलांमुलींच्या शिक्षणासाठी अल्पसंख्याक शिक्षण संस्थांना मंजुरी दिली आहे अशा अनेक महत्वाचे प्रश्न स्वतः लक्ष देऊन सोडविले आहे व दादा हेच या खात्याला ख-या अर्थाने न्याय देतील अशी आमची सर्वांची खात्री आहे. त्यामुळे दादांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मुस्लीम समाजातील जन भावनांचा आदर करुन त्यांच्या या मागणीचा विचार करावा अशी विनंती सकल मुस्लीम समाज करमाळा व भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा यांच्या वतीने अजित दादा पवार यांच्या कडे प्रत्यक्षात भेटुन करण्यात येणार आहे.  

“मुस्लिम समाजातील शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक तसेच सुरक्षा विषयक अनेक गंभीर प्रश्नांची परिणामकारक सोडवणूक करण्यासाठी, तसेच वक्फ बोर्डाच्या जमिनी व मालमत्तांमध्ये होणारा भ्रष्टाचार रोखून त्यांचे योग्य नियोजन करून त्या ठिकाणी शैक्षणिक संकुल, उद्योगधंद्यांसाठी व्यापारी संकुल आणि आरोग्य सुविधा असलेले हॉस्पिटल उभारण्यासाठी – या सर्व प्रयोजनांसाठी मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणणाऱ्या अल्पसंख्याक विकास विभाग व औकाफ मंत्रालयाची जबाबदारी  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतःकडे घ्यावी.”

हाजी लियाकत शेख,
अध्यक्ष, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाउंडेशन, करमाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!