राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्योग विभाग तालुकाध्यक्षपदी प्रसाद जगताप यांची निवड

करमाळा(संदेश प्रतिनिधी): करमाळा येथील व्यावसायिक प्रसाद कालिदास जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) उद्योग व व्यापार विभागाच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हाध्यक्ष (उद्योग विभाग) गोरख खटके पाटील यांनी केली आहे.

मोहोळ येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील,उद्योग विभागाचे जिल्हाध्यक्ष गोरख खटके यांच्या हस्ते श्री. जगताप यांना निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले.

या प्रसंगी सुहास ओहोळ, किशोर नरारे, सोहेल बागवान, बाप्पू तांबे, अजहर जमादार, राजेंद्र सूर्यवंशी आदीजण उपस्थित होते.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना श्री. जगताप यांनी सांगितले की, “माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल मी पक्षाचे आभार मानतो. ही जबाबदारी निष्ठेने पार पाडत करमाळा तालुक्यातील उद्योग व व्यापार क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.”
या निवडीबद्दल करमाळा शहर व तालुक्यातील विविध स्तरातून प्रसाद जगताप यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.



