कोरे परिवाराकडून ऊत्तरेश्वर शिवलिंगास २१ किलो खव्याचे लेपन

केम (संजय जाधव): केम (ता. करमाळा) येथील देवस्थान श्री ऊत्तरेश्वर बाबांच्या शिवलिंगाची श्रावणी सोमवारनिमित्त विशेष आकर्षक सजावट करण्यात आली. ग्रामपंचायत सरपंच सारिका कोरे व कोरे परिवाराच्या वतीने शिवलिंगास २१ किलो खव्याचे लेपन करून महादेवाच्या रूपात सजावट करण्यात आली.

ही आकर्षक आरास मंदिराचे पुजारी कृष्णा गुरव, तात्या गुरव, व भैय्या मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. श्रावणातील सोमवार असल्याने शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

कार्यक्रमास महंत जयंतगिरी महाराज, राहुल कोरे, बबलू पाटील, बाळासाहेब गुरव, प्रकाश कोरे, सुषमा कोरे, ऊत्तरेश्वर कोरे, ओंकार गवसने, सौ. भगवती, सौ. भाग्यश्री, सौ. महेश्वरी, समर्थ कोरे, प्रज्योत कोरे आदी उपस्थित होते.

या विशेष प्रसंगी भालचंद्र गावडे गुरूजी व सजेराव बिचितकर यांच्या वतीने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मसाला दूध वाटप करण्यात आले.
श्रावणी सोमवारनिमित्त मंदिरात दर सोमवारप्रमाणे शिवलिंगाची विविध रूपांत पूजा व सजावट केली जाते. यंदा खव्याने शुद्ध लेपन करून शिवलिंगाचा महादेवाच्या अवतारात साजशृंगार करण्यात आला. ही भव्य पूजा व सजावट पाहून भाविकांनी समाधान व्यक्त केले.
या पूजेमुळे भाविकांच्या मनाला अतिशय प्रसन्नता लाभली असल्याचे ह.भ.प. सुरेश थिटे महाराज यांनी सांगितले.



