दादासाहेब भिसे यांचे निधन

करमाळा(संदेश प्रतिनिधी): कोर्टी (ता. करमाळा) येथील दादासाहेब काशिनाथ भिसे यांचे बुधवार, दिनांक ६ रोजी सायंकाळी ६ वाजता निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे व परतावंडे असा मोठा परिवार आहे. ‘दै. पुण्यनगरी’चे कोर्टी प्रतिनिधी व पत्रकार बाळासाहेब भिसे यांचे ते वडील होते.