गोकुळाष्टमी निमित्त केम येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यातील केम येथील श्रीराम मंदिरात गोकुळाष्टमी निमित्त १० ऑगस्ट ते १६ ऑगस्ट अखेरपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती मधु नाना तळेकर यांनी दिली.

सप्ताहातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत —
- पहाटे ४ ते ६ – काकडा आरती
- सकाळी ९ ते १२ – ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण
- सायंकाळी ५ ते ६ – हरिपाठ
- रात्री ९ ते ११ – कीर्तन

कीर्तन सेवेसाठी ह.भ.प. श्री विंचू महाराज (करमाळा), ह.भ.प. रामराजे महाराज (कुंभारगाव), ह.भ.प. निवृत्ती महाराज सोयगावकर, ह.भ.प. तरंगे महाराज (पापणस), ह.भ.प. घनश्याम कुलकर्णी (पिंपळखुंटे) व ह.भ.प. थिटे महाराज (केम) सहभागी होणार आहेत.

विशेष कार्यक्रमांतर्गत १५ ऑगस्ट रोजी रात्री १० ते १२ या वेळेत ह.भ.प. थिटे महाराज (केम) यांचे कृष्णजन्म कीर्तन होईल. मध्यरात्री १२ वाजून ५ मिनिटांनी पुष्पवृष्टीचा कार्यक्रम होईल.
तसेच १६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. सुधीर महाराज वालवडकर यांचे काल्याचे कीर्तन होईल.

यानंतर श्री ज्ञानेश्वर दीक्षित माऊली यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.
केम परिसरातील सर्व भाविकांनी या सप्ताहातील धार्मिक सोहळ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

